Answer Key, Admit Card Job Notification Previous Year Paper Zone Nix India

About Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi | Ganesh Ji Ki Aarti in Marathi lyrics and Video – भाद्रपद महिना सुरू झाला की, वेध लागतात ते गणपती आगमनाचे. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची अगदी विधिवत पूजा केली जाते. यंदा शनिवार, २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात सकारात्मकतेचा संचार होतो. प्रत्येक जण आपापल्या परिने गणपतीचे नामस्मरण, उपासना, आराधना करत असतो. पार्थिव सिद्धिविनायक पूजन झाल्यानंतर आपल्याकडे आरत्या म्हणायची परंपरा आहे. शास्त्रांनुसार, सकाळी ९ वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी प्रदोष काळानंतर आरती करावी, असे सांगितले जाते. गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीच्या काही आरत्या खास आपल्यासाठी…

सुखकर्ता दुःखहर्ता

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती।

दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥ ॥

जय देव जय देव०॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥३॥ ॥

जय देव जय देव०॥

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुड लद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूं पादको

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता

जय देव जय देव

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि
विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी
कोटी सूरज प्रकाश ऐबी छबि तेरी
गंडस्थल मदमस्तक झूले शशि बिहारि

जय देव जय देव

भावभगत से कोई शरणागत आवे
संतत संपत सबही भरपूर पावे
ऐसे तुम महाराज मोको अति भावे
गोसावी नंदन निशिदिन गुन गावे

जय देव जय देव

Ganesh Ji Ki Aarti in Hindi

 

100+ Ganesh Chaturthi Captions for Instagram and Quotes in Hindi

Click Here

100+ Ganesh Chaturthi Captions for Instagram and Quotes in Marathi

Click Here

For More Details and regular Updates Please Bookmark Us – ZoneNixIndia

Government Jobs Notification Previous Year Papers
Answer Key Entertainment

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.